PHOTOS: 12 वर्षानंतर टेलिव्हिजनवरील बालिका वधू दिसते अशी, काही फोटोत ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:21 IST2020-06-30T13:13:34+5:302020-06-30T13:21:21+5:30
'बालिका वधू'मधील आनंदीला आता ओळखणं झालं आहे कठीण, पहा तिचे फोटो

'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर आजही आनंदीच्या नावानेच ओळखली जाते. या मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली.
बालपणीच अविका टेलिव्हिजनवरील बहू बनली आणि रसिकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली.
'बालिका वधू' मालिकेनंतर आता अविकामध्ये खूप बदल झाला आहे.
अविका गौरने 2008 साली बालिका वधू मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून अविका स्टार झाली.
या मालिकेनंतर अविका 'राजकुमार आर्यन' मालिकेत झळकली. या मालिकेत तिने राजकुमारी भैरवीच्या बालपणीची भूमिका केली होती.
'बालिका वधू' नंतर अविका गौरची 'ससुराल सिमर का' ही मालिका चर्चेत आली होती. या मालिकेत तिने विवाहित महिलेची भूमिका केली होती.
'ससुराल सिमर का' मालिकेदरम्यान अविका वयाने लहान होती. कमी वयात अविकाने विवाहित सूनेची भूमिका साकारल्यांमुळे खूप टीका झाली होती.
'ससुराल सिमर का' या मालिकेनंतर अविकाने बऱ्याच रिएलिटी शोजमध्ये सहभाग घेतला होता. 'बॉक्स क्रिकेट लीग सीझन 2', 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी सीझन 9' मध्ये ती झळकली होती.
अविकाने चित्रपटातदेखील काम केले आहे.
अविका सोशल मीडियावर खूप सक्रीय असून फोटो शेअर करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यात खूप बदल झाल्याचे पहायला मिळते.