'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 16:16 IST2025-05-11T16:07:33+5:302025-05-11T16:16:15+5:30

आज 'मदर्स डे'निमित्त आज सगळेच जण आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यात मराठी कलाकारही मागे नाहीयेत.

आईच्या त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 'मातृदिन' म्हणजेच 'मदर्स डे' साजरा केला जातो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यावेळी हा दिवस ११ मे रोजी जगभरात साजरा (Mother’s Day Celebration २०२५ ) केला जातोय.

मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Actors Celebrated Mother's Day) सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या आईप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलंय. काहींनी बालपणातील आठवणी शेअर केल्या, तर काहींनी आपल्या यशामागील खरा आधारस्तंभ म्हणजे आईच असल्याचं सांगत तिच्या प्रत्येक त्यागाला सलाम केला.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) इन्स्टाग्रामवर लहानपणीचा आईबरोबरचा फोटो शेअर करत 'मातृदिना'च्या शुभेच्छा दिल्यात. यासोबतच आईसोबतचा एक पाठमोरा फोटो शेअर करत "'मदर्स डे'च्या शुभेच्छा आई... वय कितीही असो, मला नेहमीच तुझी गरज असते आई", या शब्दात तिनं आईवरचं प्रेम व्यक्त केलं.

अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने (Swanandi Tikekar) आईसोबतचे सुंदर फोटो शेअर केलेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "तू किती शक्तीशाली आहेस!!! मला माझे आयुष्य पूर्ण जगण्याची, जसे येईल तसे स्वीकारण्याची आणि पुढे पाहत राहण्याची प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद".

स्वानंदीनं फक्त आईच नाहीत सासूबाईंनादेखील 'मातृदिना'च्या शुभेच्छा दिल्यात. तिनं लिहलं, "तुमचा गोड मुलगा मला नवरा म्हणून दिल्याबद्दल धन्यवाद आणि प्रत्येक परिस्थितीत मला समजून घेतल्याबद्दल आणि प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. मी खरोखरच धन्य आहे!"

अभिनत्री शिवाली परबने (Shivali Parab) आईबरोबरचा रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शिवाली आणि तिच्या आईचे काही खास फोटो पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिनेदेखील आईसाठी खास पोस्ट शेअर करत केली आहे. तिने आईसोबतच काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.

अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar ) इन्स्टाग्रामवर लहानपणीचा आईबरोबरचा फोटो शेअर करत 'मातृदिना'च्या शुभेच्छा दिल्यात.

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिनेदेखील आईसाठी खास पोस्ट शेअर करत केली आहे. तिने आईसोबतच काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.

'मदर्स डे'निमित्त उर्मिला कोठारेनं (Urmilla Kothare) आईसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.