"जरा देखो सजन...", खणाच्या डिझायनर ड्रेसमध्ये पूजा दिसतेय एकदम झक्कास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 04:02 PM2024-04-02T16:02:59+5:302024-04-02T16:12:26+5:30

'स्वाभिमान' फेम अभिनेत्री पूजा बिरारीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली.

स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान'- शोध अस्तित्वाचा या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारीने केलेल्या कामाची आजही चाहते स्तुती करतात.

छोट्या पडद्यावर पल्लवीची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतूनच ती प्रकाशझोतात आली.

सध्या पूजा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. स्टार प्रवाहवर 'येडं लागलं प्रेमाचं' या मालिकेच्या माध्यमातून पूजा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत पूजासोबत 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता विशाल निकम देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

अभिनेत्री पूजा बिरारी सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या खासगी तसेच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती यामार्फत चाहत्यांना देत असते.

अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या खणाच्या डिझायनर ड्रेसमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय. नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा पेहराव तिने केलाय. ( फोटो सौजन्य - पूजा बिरारी इंस्टाग्राम )