"तू नूर का झरना हैं..." सावनीच्या हटके फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; पाहा PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:11 IST2024-06-10T15:59:14+5:302024-06-10T16:11:18+5:30
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत तिने साकारलेली शेवंताची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे.
सध्या अभिनेत्री स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करताना दिसतेय.
'प्रेमाची गोष्ट'मध्ये अपूर्वा एका खलनायिकेची भूमिका साकारत आहे. सावनी असं तिच्या पात्राचं नाव आहे.
सध्या अभिनेत्री तिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
कलरफूल साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करत अपूर्वाने चाहत्याचं लक्ष तिच्याकडे वेधलंय.
'आभास हा', 'तू माझा सांगती' तसेच 'प्रेम हे' यांसारख्या मालिकांमध्येही ती झळकली आहे.
"ती जोखीम घेण्यास घाबरत नाही, कारण तिला माहिती आहे की जादू कुठे करायची आहे", असं कॅप्शन तिने या व्हायरल फोटोंना दिलंय.