कार्तिकी गायकवाड बालीमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 18:35 IST2023-08-03T18:23:05+5:302023-08-03T18:35:11+5:30

कार्तिकी गायकवाडच्या फोटोंनी वेधलं लक्ष, बालीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रसिद्धी मिळवलेली लोकप्रिय गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. सुमधूर आवाजाने कार्तिकीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. आताही कार्तिकी तिच्या गाण्याने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करते. सध्या कार्तिकी बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

कार्तिकीने तिच्या पतीबरोबरचेही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने रोनितबरोबर रोमँटिक पोझ दिल्याचंही दिसत आहे. कार्तिकीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बालीमध्ये कार्तिकी आणि रोनितने खास पेहरावही केला होता. कार्तिकीने पतीसह बाली येथील अनेक ठिकाणांना भेटी दिल्याचं तिच्या फोटोत दिसत आहे.

कार्तिकी आणि रोनितचे फोटो चाहच्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव करत कमेंटही केल्या आहेत.

कार्तिकीने डिसेंबर २०२० मध्ये रोनित पिसेसह लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. कार्तिकी आणि रोनित अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. कलाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी कार्तिकी आणि रोनित हे एक कपल आहे.

कार्तिकीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तिला घरातच संगीताचं बाळकडू मिळालं. कार्तिकीचे वडील पंडीत कल्याणजी गायकवाडही प्रसिद्ध गायक आहेत. नुकताच महाराष्ट्र शासनाच्या मानाचा कंठ संगीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं.