अतीसुंदर! तितीक्षा तावडेचा नवऱ्यासोबत गोव्यात रोमान्स, बोल्ड लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:33 PM2024-04-19T12:33:07+5:302024-04-19T12:42:56+5:30

तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके गोव्यात हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde) काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह (Siddharth Bodke) तिने लग्नगाठ बांधली.

तितीक्षा आणि सिद्धार्थ बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनी नात्यात पुढचं पाऊल घेत आयुष्यभराची गाठ बांधली. आता दोघंही हनिमूनसाठी गोव्यात आहेत. तेथील त्यांचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

मालिकेत साध्या भोळ्या लूकमध्ये दिसणाऱ्या तितीक्षाचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. गोव्यातील समुद्रकिनारी ती मनसोक्त आनंद घेत आहे. सूर्योदयाच्या वेळचा तिचा हा फोटो चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडलाय.

आकाशी रंगाच्या सुंदर अशा शॉर्ट वनपीसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. त्या हवेत उडणारे तिचे मोकळे केस सौंदर्याची शोभा आणखी वाढवत आहेत. प्रिय नवऱ्यानेच तिचे हे फोटो काढलेत. 'बीच वाली फोटो' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

सध्या प्रचंड उन्हाळा असून गोव्यातही काही कमी गरम होत नसणार. यावरच उपाय म्हणून तितीक्षाने मस्त स्वीमिंग पूलमध्ये डुंबायचा आनंद घेतला आहे. सूर्यप्रकाशात तिच्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे.

'वॉटर बेबी' असा हा तितीक्षाचा बोल्ड अवतार चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत तिच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

गोव्यातील एका कॉफी शॉपमध्ये असताना दोघांनी एकमेकांसोबत सुंर क्वॉलिटी टाईम घालवलेला दिसतोय. सोशल मीडियावर त्यांनी चाहत्यांसोबत हे क्षण शेअर केले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात तितीक्षा आणि सिद्धार्थ लग्नबंधनात अडकले. तितीक्षा सध्या मालिकेमुळे चर्चेत आहे. तर सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतोय. 'दृश्यम' सिनेमात भूमिका साकारल्यानंतर तो आता 'JNU' मध्ये दिसणार आहे.