सौंदर्याची खाण प्राजक्ता गायकवाडचा साज श्रृंगार, साखरपुड्याच्या फोटोंवरुन नजरच हटणार नाही (See Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:30 IST2025-08-08T12:23:40+5:302025-08-08T12:30:11+5:30

Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos: प्राजक्ताच्या सौंदर्याची स्तुती करावी तेवढी कमीच, असा होता engagement look

'स्वराज्यरक्षक संभाजी' , 'आई माझी काळुबाई' या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad). तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

प्राजक्ताने दोन दिवसांपूर्वी कुंकवाचा कार्यक्रम अशी पोस्ट करत सर्वांना सुखद धक्काच दिला होता. साखरपुडा ठरल्याची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र होणारा नवरा कोण? हे तिने गु्पितच ठेवलं होतं.

काल ७ ऑगस्ट रोजी प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा झाला. प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा अखेर समोर आला. प्राजक्ताच्या आयुष्यात एक सुंदर योगायोगच जुळून आला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज आहे.

मालिकेत प्राजक्ताने छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीची महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. आता तिला खऱ्या आयुष्यातही शंभुराज मिळाले आहेत. शंभुराज खुटवड असं तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.

साखरपुड्याला प्राजक्ता गायकवाडने सुंदर लूक केला होता. लाल काठ असलेली पांढरी डिझायनर साडी, हिरव्या रंगाची आकर्षक ज्वेलरी, सुंदर हेअरस्टाईल, ग्लोई मेकअप असा तिचा लूक आहे.

प्राजक्ताच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत आहे. भर मंडपात तिचा डान्स करतानाचा क्षणही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गोड हास्याने तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

प्राजक्ताचा होणारा नवरा शंभुराजही दिसायला हँडसम आहे. त्यानेही क्रीम रंगाची शेरवानी, पारंपरिक टोपी असा लूक केला आहे. त्याच्या शेरवानीवर प्राजक्ता असं नक्षीकामही केलेलं दिसत आहे.

प्राजक्ताच्या या लूकवर आणि तिच्या साखरपुड्याच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिला कॉम्प्लिमेंट दिली आहे. तसंच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो सौजन्य - Prajakta Gaikwad Instagram account