अनघाचा रॉयल कारभार; महाराणी लूकमध्ये अश्विनी वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:54 IST2022-03-24T13:49:10+5:302022-03-24T13:54:06+5:30
Ashwini mahangade: अश्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रॉयल लूकमध्ये दिसून येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे.
स्वराजरक्षक संभाजी या मालिकेत राणू अक्का ही भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे.
आई कुठे काय करते या मालिकेत ती अनघा ही भूमिका साकारत आहे.
अश्विनी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमधील फोटोही शेअर करत असते.
अश्विनीला फोटोशूटची विशेष आवड असून तिने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे.
अश्विनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रॉयल लूकमध्ये दिसून येत आहे.
मराठमोळ्या पद्धतीने तिने साजशृंगार केला आहे. त्यामुळे एखाद्या महाराणीप्रमाणेच ती भासत आहे.
अश्विनीच्या या फोटोवर नेटकरी सध्या कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
अश्विनी अनेकदा पारंपरिक पोशाखातीलच फोटो शेअर करत असते. मात्र, वेस्टर्न आऊटफिटमध्येही ती तितकीच छान दिसते.