हिरवी साडी अन् केसांत लाल गुलाब, अदिती द्रविडचं भाजीमंडईत फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 04:59 PM2024-06-12T16:59:04+5:302024-06-12T17:19:37+5:30

अदितीने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अदिती द्रविड ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील भूमिकेने अदितीला प्रसिद्धी मिळवून दिली. याबरोबरच 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्येही ती दिसली होती.

अदिती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते.

नुकतंच अदितीने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अदितीने हिरव्या रंगाची साडी नेसून केसांत लाल गुलाब माळल्याचं दिसत आहे.

अदितीने भाजीमंडईत हे फोटोशूट केल्याचं पाहायला मिळत आहे. तिने फोटोंसाठी पोझही दिल्याचं दिसत आहे.

अदितीचे हे फोटोशूट चर्चेत असून तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.