'महाराष्ट्राची हास्यजत्रे'तून बोलावणं आलं तर परत जाशील का? गौरव मोरे स्पष्टच म्हणाला...
By देवेंद्र जाधव | Updated: July 24, 2025 17:04 IST2025-07-24T16:22:08+5:302025-07-24T17:04:15+5:30
पुन्हा हास्यजत्रेत जाऊ शकतो का? असा प्रश्न विचारला असता, गौरव मोरे काय म्हणाला? नक्की वाचा

गौरव मोरे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. गौरवला आपण विविध सिनेमा, मालिकेतून अभिनय करताना पाहिलंय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून गौरव घराघरात लोकप्रिय झाला
गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये विविध भूमिका साकारल्या. या भूमिकांमधून गौरवने सर्वांना खळखळून हसवलं. पण काही वर्षांपूर्वी गौरवने हास्यजत्रेला रामराम ठोकला
गौरव मोरेने नंतर विविध रिएॅलिटी शो आणि सिनेमांमध्ये काम केलं. फिल्टरबाड्याचा बच्चन ही गौरवची खास ओळख हास्यजत्रेमुळेच त्याला दिली. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून गौरव लवकरच चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसणार आहे.
यानिमित्त लोकमत फिल्मीशी दिलखुलास संवाद गौरवने साधला. भविष्यात पुन्हा कधी हास्यजत्रेतून कॉल आला की परत ये हास्यजत्रेमध्ये तर तू जाशील का? यावर गौरव काय म्हणाला जाणून घ्या
या प्रश्नाचं उत्तर देताना गौरवने स्पष्टच सांगितलं की, "नाही, आता कठीण आहे जरा. कारण आता मी चला हवा येऊ द्यामध्ये काम करतोय ना, त्याच्यामुळे..." अशाप्रकारे गौरवने उत्तर दिलं.
पण पुढे स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करायला तरी हास्यजत्रेत जाशील का? असं विचारताच गौरवने काही सेकंद ब्रेक घेतला. पुढे म्हणाला, "पण आता आपल्याकडे आहे चला हवा येऊ द्या, माझं आहे ना आता तिथे.." असं म्हणत गौरवने खळखळून हसत उत्तर दिलं.
गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोनंतर आता 'चला हवा येऊ द्या' हा शो कसा गाजवणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे, सर्वांना याची उत्सुकता आहे.