'माझे मन तुझे झाले' मालिकेतील शुभ्रा आठवतेय ना!, जाणून घ्या सध्या ती काय करतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:00 IST2023-08-03T07:00:00+5:302023-08-03T07:00:00+5:30

२०१३ साली माझे मन तुझे झाले मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत शुभ्रा आणि राजशेखर यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.

माझे मन तुझे झाले मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळेने साकारली होती तर राजशेखरची भूमिका हरिश दुधाडेनं.

या मालिकेतून अभिनेत्री स्वरदा ठिगळेने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिने साकारलेली शुभ्राची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती.

स्वरदा मुळची पुण्याची असून तिचा जन्म २९ ऑक्टोबर, १९९३ साली झाला आहे. स्वरदाने तिच्या करियरची सुरूवात मराठी सिनेइंडस्ट्रीतून केली आहे.

तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने सांची मिश्राची भूमिका केली होती. ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने शिविकाची भूमिका साकारली होती.

सोज्वळ सौंदर्य, भावदर्शी चेहरा यामुळं अभिनेत्री स्वरदा ठिगळेला रसिकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटोही आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

स्वरदा सध्या कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नाही. मात्र तिने योगात प्रशिक्षण घेतले असून ती योगाचे धडे देणार आहे.

स्वरदाने नुकतेच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक खुशखबर शेअर केली. तिने स्वतःचा योगाचे क्लासेस सुरू केले आहेत.