अमृता फडणवीसांचा थाटच न्यारा! फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:03 PM2023-11-02T16:03:37+5:302023-11-02T16:07:38+5:30

मिसेस फडणवीसांचं सौंदर्य पाहून तुम्हालाही पडेल भुरळ, पाहा फोटो

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच चर्चेत असतात. पेशाने बँकर असलेल्या अमृता या गायिकाही आहेत. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अमृता या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवितात. नुकतंच त्यांनी इंडिया इंटरनॅशनल इन्फ्लुएन्सर अवॉर्डला हजेरी लावली होती. याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हटके कटेंटने प्रेक्षकांची मनं जिंकून इन्फ्लुएन्सरच्या जगात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा अमृता फडणवीसांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

या अवॉर्ड सोहळ्यासाठी अमृता यांनी खास लूक केला होता. काळ्या रंगाची पँट आणि ब्लेझरमध्ये स्टायलिश अंदाजात अमृता दिसून आल्या.

केस मोकळे सोडत त्यांनी साजेसा मेकअप केला होता. कानात मोठे कानातले आणि गळ्यातील नेकपीसने त्यांच्या सौंदर्यात भर पडली होती.

अमृता यांचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. वेळोवेळी अनेक कार्यक्रमांतून हे दिसूनही आलं आहे. फॅशनच्या बाबतीत अमृता बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर द्यायलाही मागे पडत नाहीत.

अमृता इन्स्टाग्रामवरुन त्यांचे अनेक फोटो शेअर करताना दिसतात. त्यांचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी त्यांच्या या फोटोवर कमेंटही केल्या आहेत.

अमृता यांनी अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.शिवतांडव स्त्रोत, बेटियां, मूड बनालिया, वो तेरे प्यार का गम ही त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली होती.

गाण्याबरोबरच अमृता यांना सामाजिक कार्याचीही आवड आहे. अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्या भाग घेताना दिसून येतात. (सर्व फोटो : अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)