२७ वर्ष टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा, आज भिक्षा मागून संन्यासी जीवन जगतेय ही अभिनेत्री
By देवेंद्र जाधव | Updated: August 11, 2025 15:42 IST2025-08-11T15:11:25+5:302025-08-11T15:42:57+5:30
अभिनेत्री धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी ती पतीसोबत वेगळी झाली. तिच्या या निर्णयाला सासू-सासऱ्यांनीही चांगलाच पाठिंबा दिला

एक बॉलिवूड अभिनेत्री जी २७ वर्ष सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करतेय. पण अचानक तिने पतीला घटस्फोट दिला आणि ती संन्यासी बनली.
या अभिनेत्रीचं नाव आहे नुपुर अलंकार. २५ नोव्हेंबर १९७२ साली नुपुरचा जन्म झाला. २००२ साली नुपुरने अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केलं
तीन वर्षापूर्वी नुपुरने अध्यात्माचा मार्ग निवडल्याने तिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुपुरचा पती आणि सासू-सासऱ्यांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला
नुपुर अलंकारने जयपूर येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर कुटुंबासोबत नुपुर मुंबईत आली. मुंबईत आल्यावर तिने कॉलेजमधील अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला
डिसेंबर २०२२ मध्ये नुपुरने मनोरंजन विश्वाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. नुपुरने धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
नुपुर सध्या भिक्षा मागून आयुष्य जगतेय. नुपुर भगवे कपडे घालून संपूर्णपणे धार्मिक स्थळांवर दिसते. सध्या अध्यात्मिक जीवन जगत असून नुपुर आनंदी आहे.
नुपुरने १५० हून जास्त मालिकांमध्ये काम केलंय. मोहे बिटिया ही कीजो, ये प्यार ना होगा कम, रेत जैसे कई, भागे रे मन अशा मालिकांमध्ये काम केलंय.