प्रेमात धोका! बॉयफ्रेंडला तीनवेळा रंगेहात पकडले, ब्रेकअपनंतर अभिनेत्रेने केलेला आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 08:00 AM2023-05-12T08:00:00+5:302023-05-12T11:16:42+5:30

अभिनेता अंकित गेराने अभिनेत्रीची तिची तीनदा फसवणूक केली होती. तिन्ही वेळा तिने अंकित गेराला रंगेहाथ पकडले होते.

अदा खान (Adaa khan) टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अदाने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमीवेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Instagram)

अदा आज आपला 3४ वा वाढदिवस सेलिब्रेट करते आहे. प्रेमामुळे कधीकाळी अदा खानचे आयुष्य नरक बनले. तिला स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला होता. (Photo Instagram)

अदाच्या वडिलांची नोकरी अचानक गेल्या त्यामुळे घरात आर्थिक चणचण भासू लागली म्हणून कॉलेजच्या दिवसांत तिने कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. त्यावेळी तिला महिन्याला केवळ 3 हजार रुपये पगार मिळायचा ज्याने ही घराचे हफ्ता भरायची. (Photo Instagram)

अदाने एका जाहिरातीपासून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. एका कॉफी शॉपमध्ये तिला दिग्दर्शकांनी तिला पाहिलं आणि तिथेच तिला पहिली ऑफर मिळाली. अदा अभिनेत्री असण्यासोबत बेली डान्सरदेखील आहे.(Photo Instagram)

२००९ साली पालमपूर एक्स्प्रेसमधून अदाने तिच्या टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली. या मालिकेनंतर तिला अनेक भूमिका मिळाल्या. अदा खानने टीव्ही शो 'बहनें' मध्ये आकाशीची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने अमृत मंथन शोमध्ये 'अमृत' ची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

एकता कपूरच्या शो नागीनमध्ये शेषाची व्यक्तिरेखा साकारून अदा घराघरात पोहोचली. या भूमिकेत अदा खानला चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)

अदाने अभिनेता अंकित गेराला डेट केलं. चार वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांचं ब्रेकअप झालं असं अदाने एका मुलाखतीत सांगितलं.

अदा खानला अंकित गेरासोबत आयुष्य घालवायचे होते. पण अंकित गेरा 'सपने सुहाने लडकपन'च्या सेटवर कॉस्टार रुपल त्यागीच्या जवळ आला. रुपल त्यागीच्या एन्ट्रीनंतर अंकित आणि अदाचे मार्ग वेगळे झाले.

अंकित गेराने तिची तीनदा फसवणूक केल्याचा खुलासा खुद्द अदा खानने केला होता. तिन्ही वेळा अदा खानने अंकित गेराला रंगेहाथ पकडले.

अदा खानने अंकित गेराला प्रत्येक वेळी सुधारण्याची संधी दिली. मात्र, प्रत्येक वेळी अदा खानची निराशाच झाली.

अंकित गेरासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अदा खान आतून तुटली होती. ब्रेकअपनंतर अदा खानला तिचे आयुष्य संपवायचे होते. या धक्क्यातून बाहेर यायला अदा खानला बराच वेळ लागला.