Aai Kuthe Kay Karte : अभिषेक आणि अनघाच्या लग्नाचे फोटो आले समोर, होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 13:55 IST2022-01-07T13:48:23+5:302022-01-07T13:55:52+5:30

Aai Kuthe Kay Karte : अभिषेक आणि अनघाचा विवाह नुकताच संपन्न झाला. त्यांच्या या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लवकरच अनघा आणि अभिषेकचा विवाह सोहळा पार पडणार आहे.

अभिषेक आणि अनघाच्या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

अभिषेक आणि अनघाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते.

या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात आहे.

अनघा आणि अभिषेकचा पारंपरिक लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. तसेच देशमुख कुटुंबातील सर्वच सदस्यांचा पारंपारिक लूक चर्चेत आला आहे.

या विवाह सोहळ्यासाठी प्रत्येक पात्राच्या लूकसाठी मालिकेच्या टीमने विशेष मेहनत घेतली आहे.

देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.