‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:27 IST2018-11-16T21:09:29+5:302018-11-16T21:27:59+5:30

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
इटलीतील लेक कोमोच्या काठावर असलेल्या ‘विला डेल बालबिअॅनेलो’वर त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये ‘दीपवीर’चा शाही विवाहसोहळा पारंपरिक कोंकणी पद्धतीने पार पडला.
या दोन्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
दीपवीरनं लग्नासाठी एकदम रॉयल ठिकाण निवडलं आहे.
इटलीतील लेक कोमो हे ठिकाण अनेकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलं आहे.