जोतिबाच्या नावानं चांगभलं...! सुयश टिळक व आयुषी भावेचं पहिलं देवदर्शन, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 11:08 IST2021-10-29T10:42:08+5:302021-10-29T11:08:54+5:30

Suyash Tilak व Ayushi Bhave दोघांनी जोतिबा व कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं.

मराठमोळा अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे गेल्या 21 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकले.

लग्नानंतर हे नवदांम्पत्य देवदर्शनासाठी निघालं. सध्या सोशल मीडियावर याच देवदर्शनाचे फोटो व्हायरल होत आहेत.

सुयश व आयुषी दोघांनी जोतिबा व कोल्हापूरच्या श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं.

याचे काही फोटो सुयशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. दोघंही गुलालात रंगली आहेत.

पहिल्यांदा नवीन जोडपं जोतिबाच्या दर्शनाला पोहोचलं आणि मग दोघांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं.

लग्नानंतरच सुयश आणि आयुषीचं हे पहिलं देवदर्शन आहे. सुयश व आयुषी काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले.

कोरोनामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नसोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.