अंकिता लोखंडेने अशाप्रकारे साजरा केला तिचा बर्थडे, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 16:11 IST2020-12-19T16:09:47+5:302020-12-19T16:11:06+5:30

अंकिताचा आज वाढदिवस असून तिचा जन्म इंदोरमध्ये झाला आहे. तिचे वडील बँकेत काम करायचे तर आई शिक्षिका होती.

झी सिनेस्टार या कार्यक्रमाद्वारे २००६ मध्ये तिने तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली.

अंकिताने तिच्या वाढदिवसाच्या सलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अंकिताला पवित्र रिश्ता या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.

पवित्र रिश्ता या कार्यक्रमात सुशांत सिंह रजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. याच कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

अंकिता आणि सुशांत अनेक वर्षं नात्यात होते. ते दोघे लग्न करतील असे त्यांच्या फॅन्सना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला.

अंकिताने मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

अंकिता सध्या विकी जैनसोबत नात्यात असून ते लवकरच लग्न करणार आहेत.