एकेकाळी कपड्याच्या फॅक्ट्रीत काम करायचा, आता आहे सुपरस्टार; जिंकलेत अनेक पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:34 IST2023-11-17T13:23:10+5:302023-11-17T13:34:55+5:30
अभिनेत्याने 2 नॅशनल आणि 6 साऊथ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीत येणं आणि मोठा स्टार होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण ते सर्वांसाठी सोपं नसतं. अशाच एका सुपरस्टारच्या संघर्षमयी प्रवासाबाबत जाणून घेऊया. हा अभिनेता अत्यंत लोकप्रिय असून महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 च्या यादीत एकदा, दोनदा नव्हे तर 6 वेळा त्याचा समावेश झाला आहे. अभिनेत्याने 2 नॅशनल आणि 6 साऊथ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. हा अभिनेता म्हणजे सरवनन शिवकुमार. सूर्या म्हणून तो ओळखला जातो.
23 जुलै 1975 रोजी सूर्याचा जन्म झाला. तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सूर्या तमिळ चित्रपट स्टार शिवकुमार यांचा मुलगा असल्याने त्याला अभिनयाचा वारसा मिळाला आहे. तो केवळ अभिनेताच नाही तर प्रोड्यूसर आणि डिस्ट्रीब्यूटर आहे.
सूर्याने 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आतापर्यंत त्याने आपल्या करिअरमध्ये 42 चित्रपट केले आहेत. अभिनेता होण्याआधी सूर्याने काही महिने एका कपड्याच्या फॅक्ट्रीत काम केलं पण त्याने आपल्या प्रसिद्ध वडिलांबद्दल कोणालाही सांगितलं नाही.
सूर्याने आपली ओळख लपवून काही महिने कपड्याच्या फॅक्ट्रीत काम केलं परंतु अखेरीस त्याच्या मालकाला सत्य कळलं. वयाच्या 22 व्या वर्षी नेरुक्कू नेर (1997) मधून अभिनयाला सुरुवात केली.
90 च्या दशकात सूर्याने अनेक हिट चित्रपट दिले आणि साऊथ चित्रपटांचा मोठा स्टार बनला. सूर्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचे लाखो चाहते आहेत.
'सिंघम' सीरीज व्यतिरिक्त 'गजनी' आणि 'आयुथा एझुथू' हे सिनेमे सूर्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे सिनेमे ठरले. यापैकी काहींचे हिंदी रिमेकही आले आणि ते ब्लॉकबस्टर ठरले.
सुर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केलं आहे आणि या कपलने 6 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे, त्यातील पहिला चित्रपट पूवेल्लम केट्टुप्पार (1999) होता. या दोघांनी 11 सप्टेंबर 2006 रोजी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं आहेत.
सूर्या भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. या अभिनेत्याने आपल्या अभिनयासाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 6 साऊथ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. या अभिनेत्याकडे 186 कोटी रुपयांची संपत्ती आहे.