बॉलिवूडचा टॉपचा व्हिलन पण तरीही बॉबी देओलला साऊथमध्ये मिळालं कमी मानधन, एकट्या थलपती विजयने घेतले २२० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 11:43 IST2026-01-07T11:35:15+5:302026-01-07T11:43:23+5:30

बॉलिवूडचा टॉपचा व्हिलन असूनही बॉबी देओलला 'जन नायकन' सिनेमासाठी फारच कमी मानधन मिळालं आहे.

थलपती विजयचा शेवटचा सिनेमा 'जन नायकन' ९ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. थलपतीने अभिनयातून निवृत्ती घेतल्याने त्याचा हा शेवटचा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'जन नायकन' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या थलपती विजयने या सिनेमासाठी तब्बल २२० कोटी मानधन घेतलं आहे.

या सिनेमात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलही मुख्य भूमिकेत आहे. बॉबी देओल या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

पण, बॉलिवूडचा टॉपचा व्हिलन असूनही बॉबी देओलला 'जन नायकन' सिनेमासाठी फारच कमी मानधन मिळालं आहे.

'जन नायकन'चं बजेट हे एकूण ३८० कोटी इतकं आहे. या सिनेमातील कलाकारांच्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.

तर दिग्दर्शक एच विनोद यांना २५ कोटी मिळाले आहेत. तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर यांना १३ कोटी मानधन मिळालं आहे.

अभिनेत्री पूजा हेगजेदेखील या सिनेमात दिसणार आहे. 'जन नायकन'साठी पूजाने ३ कोटी मानधन घेतलं आहे.

तर सगळ्यात कमी मानधन बॉबी देओलला मिळालं आहे. मुख्य खलनायकाचं पात्र असूनही बॉबी देओलला फक्त ३ कोटी मानधन देण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या सिनेमाच्या शूटिंगसाठी ४८ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तक सेट उभारण्यासाठी १५ कोटी खर्च केले गेले आहेत.