संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:59 AM2024-04-08T11:59:45+5:302024-04-08T12:11:55+5:30

१०० कोटींचा बंगला, ७ कोटींची व्हॅनिटी व्हॅन अन्...; अल्लू अर्जुनच्या संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

'झुकेगा नहीं साला' म्हणत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. अल्लू अर्जुन त्याचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे.

२००३ साली गंगोत्री सिनेमातून तेलुगू सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अल्लू अर्जुनने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण, २०२१ साली प्रदर्शित झालेल्या पुष्पा सिनेमाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली.

गेल्या २० वर्षांपासून अल्लू अर्जुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पारुगु, जुलाई, रेस गुर्रम, एस ओ सत्यमूर्ती, सर्रेनोडू असे सुपरहिट सिनेमे त्याने इंडस्ट्रीला दिले. रोमँटिक भूमिकांबरोबरच त्याने डॅशिंग हिरोच्या भूमिकाही एकदम चोख निभावल्या.

पण, यशाचा पल्ला गाठण्यासाठी अल्लू अर्जुनला खूप संघर्ष करावा लागला. सुरुवातीला अल्लू अर्जुनने अॅनिमेटर म्हणून काम केलं आहे. यासाठी त्याला साडेतीन हजार रुपये मानधन मिळायचं.

एकेकाळी ३ हजारात काम करणारा अल्लू अर्जुन आता कोट्यधीश आहे. पुष्पानंतर अल्लू अर्जुन आता एका सिनेमासाठी तब्बल १०० कोटी रुपये आकारतो.

अल्लू अर्जुन आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे ७ कोटी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे. याबरोबरच अनेक महागड्या गाड्याही त्याच्याकडे आहेत.

अल्लू अर्जुनच्या आलिशान घराची किंमत तब्बल १०० कोटींच्या घरात आहे.

झुकेगा नहीं साला म्हणणारा अल्लू अर्जुन कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्या नावावर तब्बल ४६० कोटी रुपयांची संपत्ती आहे.