एक छोटासा घर! लंडनमध्ये सोनमने सजवलाय स्वप्नांचा राजमहल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 16:20 IST2021-09-09T16:12:35+5:302021-09-09T16:20:56+5:30

Sonam kapoor : सोनमने तिच्या घराचा प्रत्येक कोपरा न् कोपरा अत्यंत सुंदररित्या सजवला आहे.

बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून अभिनेत्री सोनम कपूरकडे पाहिलं जातं. वेगवेगळ्या फॅशन बिंधास्तपणे कॅरी करणारी सोनम कायमच तिच्या युनिक निवडीसाठी चर्चेत असते.

अलिकडेच सोनमने लंडनमध्ये नवं घर खरेदी केलं असून या घराचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

सोनमच्या या घराचं फोटोशूट Architectural Digest या मासिकासाठी करण्यात आलं होतं.

रेड वेलवेट सोफ्यावर आरामात झोपून सोनमने खास फोटोसाठी पोझ दिली आहे.

सोनमने तिच्या घराचा प्रत्येक कोपरा न् कोपरा अत्यंत सुंदररित्या सजवला आहे.

भारतीय पद्धत आणि पाश्चात्य पद्धत यांचा सुरेख संगम सोनमच्या घरात पाहायला मिळत आहे.

घरातील किचन असो वा बेडरूम सोनमने घरातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट असण्याकडे लक्ष दिलं आहे.

सोनमने या घरात तिचं फोटोशूटदेखील केलं आहे.

या घराला मोठमोठे दरवाजे असून त्याला डीप ग्रीन रंग देण्यात आला आहे. ( फोटो सौजन्य: सर्व फोटो सोनम कपूर इन्स्टाग्राम पेज)