व्हाईट टॉप अन् यलो स्कर्टमध्ये शिल्पा शेट्टी दिसली ग्लॅंमरस अंदाजात, पहा तिचे Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:53 IST2018-11-29T16:50:57+5:302018-11-29T16:53:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच मुंबईतील वांद्रे येथे व्हाईट टॉपसोबत यलो स्कर्टमध्ये दिसली. त्या गेटअपमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती.
शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांदेखील खूप भावला, डिसेंट लूकमध्ये शिल्पा सुंदर दिसत होती.
हल्ली शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
शेवटची ती ढिश्क्यावं सिनेमात गेस्ट अपियरन्स करताना दिसली होती.
शिल्पाने चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे.
नुकतीच शिल्पा तिचा नवरा राज कुंद्रासोबत मालदीवला सुट्ट्या व्यतित करण्यासाठी गेली होती. या टूरचे फोटो शिल्पाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिल्पाने व्यावसायिक राज कुंद्रासोबत विवाह केला आणि तिला सहा वर्षांचा मुलगा आहे. ज्याचे नाव विवान आहे.