Shahrukh Khan Birthday: शाहरुख खानच्या 55व्या बर्थडेच्या निमित्ताने पाहा त्याचे कधीही न पाहिलेले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 14:37 IST2020-11-02T14:37:26+5:302020-11-02T14:37:26+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करीत आहे. (Photo Instagram)

शाहरुख खानचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला होता. (Photo Instagram)

शाहरुख खानने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी घेतली आहे. (Photo Instagram)

शाहरुख खानने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

बॉलिवूडमध्ये शाहरुखने 'दिवाना' या चित्रपटामधून एन्ट्री केली होती, जो हिट ठरला होता. (Photo Instagram)

शाहरुख खान अनेक वर्षे गौरीला टेड करत होता, त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 साली दोघे लग्नाच्याबेडीत अडकले. (Photo Instagram)

शाहरुख आणि गौरी खान यांना आर्यन, सुहाना आणि अब्राहम ही तीन मुले आहेत. (Photo Instagram)

शाहरुख खानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 23 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

. 2018 मध्ये तो देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता रला होता. मुंबईत त्याचा मन्नत नावाचा बंगला आहे. आजघडीला या बंगल्याची किंमत 200 कोटी रूपये आहे. अलिबाग येथे त्याचे फार्महाऊस आहे. याची किंमतही कोट्यवधीच्या घरात आहे.(Photo Instagram)