एकही रुपया न घेता शाहिद कपूरने 'या' सिनेमात काम केलेलं; तुम्ही पाहिलाय २०१४ साली आलेला 'हा' सिनेमा?

By देवेंद्र जाधव | Updated: January 21, 2026 15:58 IST2026-01-21T15:44:02+5:302026-01-21T15:58:21+5:30

शाहिद कपूरने या सिनेमात फुकट काम केलं होतं. हा सिनेमा तुम्ही पाहिलाय? नसेल पाहिला तर बातमीवर क्लिक करुन नक्की जाणून घ्या या सिनेमाबद्दल

शाहिद कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. शाहिद कपूरने २०१४ साली आलेल्या एका सिनेमात एकही रुपया न घेता काम केलं होतं.

हा सिनेमा होता 'हैदर'. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमात शाहिदने एकही रुपया न घेता काम केलं होतं. त्यामागचं कारणही शाहिदने सांगितलं.

'हैदर' सिनेमा हा शेक्सपिअरच्या गाजलेल्या हॅम्लेट या नाटकावर आधारीत आहे. कमिनेनंतर शाहीद विशाल यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करणार होता.

शाहिद त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे साहजिकच शाहिदचं मानधन त्यावेळी खूप जास्त होतं.

शाहिदला त्यावेळी मानधन दिलं असतं तर सिनेमाचं बजेट कोलमडलं असतं. इतकंच नव्हे सिनेमाचं शूटिंग होणार नाही, अशीही परिस्थिती निर्माण झाली असती.

त्यामुळे शाहिद कपूरने सर्व गोष्टींचा विचार करुन एकही रुपया मानधन न घेण्याचं ठरवलं. शाहिदने 'हैदर' सिनेमात फुकट काम केलं.

२०१४ साली आलेला 'हैदर' हा सिनेमा खूप गाजला. शाहिद कपूर, इरफान, तब्बू, के के मेनन अशा अनेक तगड्या कलाकारांची या सिनेमात भूमिका आहे