‘मिल्की गर्ल’ तमन्ना भाटियाचे हे फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 17:33 IST2020-05-19T16:58:08+5:302020-05-19T17:33:32+5:30

तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला.

तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली आहे.

२००५ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'चाँद सा' रोशन चेहरा या सिनेमातून तिने अभिनयाच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं होतं.

मात्र तिचा पहिलाच सिनेमा तिकीटखिडकीवर आपटला.

सिनेमाला रसिकांनी नाकारल्याने तमन्नाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेमाकडे वळवला.

तमन्ना भाटियाने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना नाव चांगलंच हिट ठरलं, तिच्या सिनेमांना दक्षिणेकडील रसिकांनी डोक्यावर घेतलं.

दक्षिणेत नाव कमावल्यानंतर बॉलीवुडमध्ये नाव कमावण्याचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती २०१३ साली मुंबईत आली.

साजिद खान दिग्दर्शित हिम्मतवाला सिनेमातून अजय देवगणसारख्या बड्या कलाकारासह तिने हिंदीत पुनरागमन केलं

भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत तमन्ना रिलेशनशीपमध्ये होती अशा चर्चा रंगल्या होत्या.

बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.