पाकिस्तानी म्हणतात भारतात जा, भारतीय म्हणतात पाकिस्तानात जा, मी...; दिग्दर्शक कबीर खान पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:24 PM2022-03-28T16:24:45+5:302022-03-28T16:31:10+5:30

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कबीर खान (Director Kabir Khan) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देशभक्ती आणि राष्ट्रवादावर भाष्य केलं.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कबीर खान (Director Kabir Khan) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देशभक्ती आणि राष्ट्रवादावर खुलेपणाने भाष्य केलं. सातत्यानं ट्रोल करणाऱ्या आणि पाकिस्तानात जाण्यास सांगणाऱ्या लोकांवर त्यानं भाष्य केलं.

कबीर खाननं सतत ट्रोल करणारे आणि त्याला पाकिस्तानात जाण्यास सांगणाऱ्या लोकांवर वक्तव्य केलं. सोशल मीडियावर लोक जेव्हा टीका करतात तेव्हा वाईट वाटते, असे तो म्हणाला. त्यांच्या मते, त्यांना वाटते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ट्रोल करणाऱ्यांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) जेव्हा आपल्यावर टीका केली जाते, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनं ट्रोलर्सना काहीही बोलण्याच स्वातंत्र्य दिलं आहे असं वाचक असल्याचंही त्यानं म्हटलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कबीर खाननं अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "सध्याच्या काळात सोशल मीडियामुळे लोकांना काहीही बोलण्याची सूट मिळाली आहे. १० वर्षांपूर्वी त्यांना असं करत येत नव्हतं," असं तो म्हणाला.

सध्या शब्दांच्या निवडीबद्दल लोक आपली जबाबादारी समजत नाहीत. या गोष्टीचं मला वाईट वाटतं. परंतु हे सत्य आहे. सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता अधिक आहे असं वाटत असल्याचंही त्यानं नमूद केलं.

"माझं नाव खान आहे आणि यासाठी मला पाकिस्तानात जा असं म्हचलं. मी एकदा पाकिस्तानात गेलो, तेव्हा लष्कर-ए-तोयबानं मला भारतात जा असं सांगितलं. या हिशोबानं तर ना मी इथला झालो ना तिथला," असंही तो म्हणाला.

देशभक्ती आणि राष्ट्रवादावर बोलताना कबीर खान म्हणाला, "प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्याने स्वतःचे प्रतिबिंब असलं पाहिजे. आपण कधी कधी चित्रपटात तिरंगा दाखवतो, पण आज देशभक्ती आणि राष्ट्रवाद यात फरक आहे."

यावेळी त्यानं आपला चित्रपट '83' चं उदाहरण दिलं. "आपल्याला राष्ट्रवादासाठी एक काऊंटरपॉईंट व्हिलनची गरज असते, परंतु देशभक्तीसाठी कोणत्याही गोष्टीची गरज नाही," असं त्यानं नमूद केलं. 83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका अभिनेता रणवीर सिंह यानं साकारली होती. तर दीपिका पदुकोण हीनं कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांचं भूमिका साकारली होती.