आकाश ठोसरच्या कुटुंबियांना कधी पाहिलंय का? जाणून घ्या कोण आहे त्याच्या फॅमिलीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 14:00 IST2023-05-21T13:56:39+5:302023-05-21T14:00:10+5:30
Akash thosar: सोशल मीडियावर आकाशच्या फिल्मी करिअरची कायम चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर.
उत्तम अभिनयाच्या जोरावर आकाशने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे.
अलिकडेच त्याचा घर, बंदूक, बिरयानी हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.
गेल्या काळापासून आकाशच्या सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे.
आकाश वरचेवर इन्स्टाग्रामवर त्याचे काही स्टायलिश फोटो शेअर करत असतो.
सोशल मीडियावर आकाशच्या फिल्मी करिअरची कायम चर्चा रंगते. मात्र, यावेळी त्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
आकाशच्या कुटुंबात नेमकं कोण असेल, त्याचे कुटुंबीय काय करतात हा प्रश्न अनेकांना पडतो.
आकाशच्या कुटुंबात त्याची आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असल्याचं सांगण्यात येतं.
आकाशच्या बहिणींची लग्न झाली असून तो कायम त्याच्या भाचीसोबतचे गोड फोटो शेअर करत असतो.