चाकू हल्ल्यामुळे शेड्युल बिघडलं, सैफ अली खानच्या आगामी ६ सिनेमांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:31 IST2025-01-16T16:05:08+5:302025-01-16T16:31:54+5:30

सैफ अली खानवर आज १६ जानेवारीला पहाटे हल्ला झाल्याने त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग थांबलंय (saif ali khan)

सैफ अली खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सैफवर आज (१६ जानेवारी) एका चोराने चाकू हल्ला केला. त्यामुळे सैफ चांगलाच जखमी झाला

सैफ अली खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून तो लवकरात लवकर बरा होईल अशी सर्वांना आशा आहे. सैफवर अचानक या घटनेचा सामना करावा लागल्याने त्याच्या आगामी सिनेमांचं शूटिंग बिघडलंय.

सैफ सध्या 'ज्वेल थीफ: द रेड सन' या सिनेमाचं सिद्धार्थ आनंदसोबत शूटिंग करत होता. याशिवाय सैफचे आगामी काही सिनेमेही चर्चेत आहेत

सैफ सध्या 'रेस ४', याशिवाय साउथ सुपरस्टार प्रभाससोबत संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'स्पिरीट' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.

याशिवाय गेल्या वर्षी सैफचा गाजलेला सिनेमा 'देवरा'चा पुढच्या भागाची सैफ तयारी करत होता. 'देवरा पार्ट २'मध्ये सैफसोबत पुन्हा एकदा ज्यु.एनटीआर दिसणार आहे

याशिवाय 'क्लिक शंकर' आणि 'शूटआऊट अॅट भायखळा' या अंडरवर्ल्डवर आधारीत सिनेमांच्या शूटिंगची सैफ तयारी करत होता.

सैफसोबत अचानक ही घटना घडल्याने पुढचे काही महिने तरी सैफ आराम करणार आहे. याशिवाय हल्ला झाल्याने त्याच्या सुरक्षेसाठी कडक पहारा असेल. म्हणूनच सैफच्या आगामी सिनेमांचं शूटिंग थांबलंय