रिशी भी चला गया... धर्मेंद्र यांच्याकडून शोक व्यक्त, क्रीडा अन् सिनेजगतातून आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:57 IST2020-04-30T17:18:02+5:302020-04-30T17:57:58+5:30

अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बोनी कपूर यांनी ट्विटरवरु बालपणीचे फोटो शेअर करत ऋषी यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या.
सुमिते कडेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला, तसेच हा व्हिडिओ पाहून मी अश्रू थांबवू शकलो नसल्याचे त्यांनी म्हटलंय
अभिनेता आणि लिजेंड धर्मेंद्र देओल यांनीही ट्विटरवरुन भावुक प्रतिक्रिया देताना, आज रीषी भी चला गया... असे म्हटलंय.
गायक सलिम मर्चंट यांनी ऋषी कपूर यांनी गायलेल्या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली.
दंगब स्टार सलमान खाननेही ऋषी कपूर यांच्याबद्दल लिहिताना कहा सुना माफ.. असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली
अभिनेत्री सीमी गिरेवाल यांनीही ट्विट करुन माझा सर्वात जवळचा मित्र, माझा डार्लिंग गेल्याचं म्हटलंय
भाजपा खासदार आणि माजी क्रिकेट गौतम गंभीरनेही ऋषी कपूर यांना आदरांजली वाहत, लहानपणीची आठवण व्यक्त केली.
चित्रपट समिक्षक अनुपमा चोप्रा यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत ऋषी कपूर यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
टीम इंडियाचा क्रिकेटर आक्रमक फलंदाज सुरेश रैनाही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त केला.
बॅडमिंटनपटू सायना नेहवालनेही सर.. आम्ही तुम्हाला कायम मिस करु.. असे म्हणत शोक व्यक्त केला.
दक्षिण भारतीय इंडस्ट्रीतील स्टार महेश बाबू आणि अभिनेता व राजकीय नेता पवनकल्याण यांनीही दु:ख व्यक्त करत ही शॉकिग न्यूज असल्याचं म्हटलंय