खल्लास!! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाच्या फोटोंचीच चर्चा, सोशल मीडियावर उडालाय नुसता धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 18:13 IST2021-12-13T17:59:38+5:302021-12-13T18:13:42+5:30

Rashmika Mandanna PICS : होय, ‘पुष्पा’ या आगामी चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका आली आणि तिला पाहून चाहते अक्षरश: बेभान झालेत....

साऊथची सुपरस्टार आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आली आणि तिला पाहून चाहते अक्षरश: बेभान झालेत. होय, ‘पुष्पा’ या आगामी चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रश्मिका आली आणि तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली.

या इव्हेंटमधील काळ्या साडीतील तिचे फोटो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

काळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये रश्मिका प्रचंड सुंदर दिसत आहे. फोटोंमध्ये रश्मिका वेगवेगळे लूक देताना दिसत आहे.

ट्विटर फॅन्सनी रश्मिकांचे हे फोटो शेअर करण्याचा नुसता धडाका लावला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा नुसता पूर आला आहे.

रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा-द राइज पार्ट 1’ हा सिनेमा येत्या 17 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेलुगूसोबतच हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रश्मिका पहिल्यांदाच अल्लू अर्जुनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. रश्मिकाच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

तुम्हाला माहित असेलच की, रश्मिका लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती स्पाय थ्रिलर ‘मिशन मजनू’ या चित्रपटात झळकणार आहे.

याशिवाय ‘गुडबाय’ या आगामी चित्रपटात रश्मिका अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहेत.