तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ! प्रसाद ओकचे पत्नी मंजिरीसोबत खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:07 IST2021-08-31T16:48:48+5:302021-08-31T17:07:37+5:30
प्रसाद ओकने पत्नी मंजिरीसह खास फोटोशूट केले आहे. दोघांचाही अंदाज सोशल मीडियावर रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. पाहा या सुंदर जोडप्याचे सुंदर फोटो.

सोशल मीडियावर प्रसाद आणि मंजिरी दोघेही सक्रीय असतात.
दोघेही एकमेकांसोबतचे खास फोटो चाहत्यांसह शेअर करताना दिसतात.
पुन्हा एकदा या कपलचे फोटो समोर आले आहेत.
दोघांची केमिस्ट्री पाहून चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोघांच्या केमिस्ट्रीप्रमाणे त्यांची लव्हस्टोरीही खास आहे.
7 जानेवारी 1998 मध्ये प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते.
प्रसादचे मंजिरीसह लव्ह मॅरेज आहे.
प्रसादप्रमाणे मंजिरीलाही अभिनयाची आवड आहे.
अभिनय कार्यशाळेतच दोघांची पहिली भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीलाही सुरुवात झाली होती.
विशेष म्हणजे दोघांपैकी कुणीही प्रमोज केले नाही.
एकमेकांना ते आवडू लागल्याचे त्यांचेच त्यांना कळाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.