MET GALA 2018 : रेड कार्पेटवरील प्रियांका चोप्राचा कॅथोलिक लूक चर्चेत, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-08T16:30:47+5:302018-06-27T19:50:38+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्रा मेट गाला २०१८ च्या रेड कार्पेटवर अतिशय हटके अंदाजात बघावयास मिळाली. गेल्यावर्षी प्रियांका याठिकाणी ट्रेंच कोट परिधान करून आली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळेसही तिचा नवा लूक चर्चेचा विषय बनला आहे. यावर्षी या प्रियांका गालामध्ये कॅथोलिक लूकमध्ये बघावयास मिळाली. मेट गाला २०१८ च्या --- या थिमवर प्रियांकाने हा लूक धारण करण्यासाठी एका अमेरिकन फॅशन डिझायनरची मदत घेतली. हा इव्हेंटमध्ये न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे.