Priya Bapat : वेबसीरिजमधील लेसबियन बोल्ड सीन पाहून प्रिया बापटच्या वडिलांची होती ही प्रतिक्रिया, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 11:55 IST2025-09-26T11:41:52+5:302025-09-26T11:55:36+5:30

Priya Bapat : प्रिया बापट अलिकडेच हिंदी हॉरर वेबसीरिज अंधेरामध्ये झळकली. यात तिने सुरवीन चावलासोबत लेसबियन बोल्ड सीन दिले आहेत. या सीन्सची सर्वत्र खूप चर्चा झाली. यापूर्वी २०१९ मध्ये प्रियाने 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमध्येही लेसबियन बोल्ड सीन दिले होते. त्यातील हे सीन्स खूप व्हायरल झाले होते.

अभिनेत्री प्रिया बापट सातत्याने चर्चेत येत असते. नुकताच तिचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला.

या चित्रपटाच्या आधी प्रिया हिंदी हॉरर वेबसीरिज अंधेरामध्ये झळकली. यात तिने सुरवीन चावलासोबत लेसबियन बोल्ड सीन दिले आहेत. या सीन्सची सर्वत्र खूप चर्चा झाली.

यापूर्वी २०१९ मध्ये प्रियाने 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमध्येही लेसबियन बोल्ड सीन दिले होते. त्यातील हे सीन्स खूप व्हायरल झाले होते. दरम्यान एका मुलाखतीत हे सीन्स पाहून तिच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल अभिनेत्रीने सांगितले.

'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमध्ये प्रियाने कणखर राजकारण्याची भूमिका साकारली होती. यात तिने लेसबियन तरुणीची भूमिका साकारली होती. यात तिने बोल्ड सीन्स दिले होते आणि या बोल्ड सीन्सची क्लिप व्हायरल झाली होती.

त्यादरम्यान प्रिया बापट हिने आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तेव्हा तिच्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती याबद्दल सांगितले.

सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरिजमधील एका बोल्ड सीनची क्लिप व्हायरल झाली होती, जी अभिनेत्री प्रिया बापट आणि तिच्या सह-अभिनेत्रीसोबतची होती. वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने प्रियाला याची कल्पना नव्हती, पण जेव्हा कोणीतरी ती क्लिप पाठवली, तेव्हा तिला याबाबत कळलं.

यावर तिने कोणालाही कळण्याआधी सर्वात आधी आपल्या वडिलांना फोन केला. तिने आपल्या कामाबद्दल आणि बोल्ड सीनबद्दल त्यांना सर्व माहिती दिली. 'माझ्या कामाची तुम्हाला लाज वाटत नाही ना?' असे तिने आई-वडिलांना विचारले.

यावर त्यांच्या जबरदस्त उत्तराने तिची बाजू घेतली. "हा तुझ्या कामाचा भाग आहे. तू काम म्हणून ते केलंस. आम्हाला त्यात काही गैर वाटत नाही. तू लोकांकडे लक्ष देऊ नकोस," असे तिच्या आई-वडिलांनी ठामपणे सांगितले.

या बोल्ड सीनमुळे अनेकदा प्रश्न उपस्थित झाले असतानाही, प्रिया बापट हिने नेहमीच प्रामाणिकपणे आणि कणखरपणे या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.