THEN & NOW PHOTOS: मराठमोळी अभिनेत्री अलका कुबल यांच्यात झालाय इतका बदल, पाहा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:26 PM2022-09-23T13:26:38+5:302022-09-23T13:40:22+5:30

Alka Kubal : अलका कुबल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अलका कुबल यांचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

'माहेरची साडी','चार दिवस सासूचे', 'वहिनीची माया' अशा कितीतरी चित्रपटांमधून अलका कुबल भेटीला आल्या आहेत.

आजवरच्या कारकिर्दीत अलका कुबल यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.

अलका कुबल यांनी नुकताच इंस्टाग्रामवर त्यांचा पहिला चित्रपट जो १९८० साली रिलीज झाला त्याचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटाचं नाव आहे चक्र.

अलका कुबल यांनी चक्र चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत काम केले होते. छान जुनी आठवण म्हणत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.

अलका कुबल यांच्या पहिल्या चित्रपटातील लूक पाहून आता त्यांच्यात खूप बदल झालेला पाहायला मिळतो आहे.

बराच काळ रुपेरी पडदा गाजवल्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला होता. मध्यंतरी 'आई माझी काळुबाई' (aai mazi kalubai) या मालिकेत त्या झळकल्या.

त्यानंतर आता पुन्हा त्या रुपेरी पडद्याकडे वळल्या आहेत.

लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटात अलका कुबल झळकणार आहेत.

या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये पार पडले. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत स्क्रीन शेअर करणार आहेत.