अभिनेत्री तेजस्विनी पंडितसाठी तिच्या बहिणीची पोस्ट, म्हणाली "मला कधीच भावाची कमतरता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 15:17 IST2025-08-10T15:03:29+5:302025-08-10T15:17:53+5:30
तेजस्विनी पंडित सोबत तिची बहीण पौर्णिमा देखील खूप सुंदर आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की, तेजस्विनी पंडितला सख्खी बहिण आहे आणि ती अगदी हुबेहूब तिच्यासारखीच दिसते.
तेजस्विनी पंडितची सख्ख्या बहिणीचे नाव पौर्णिमा आहे. पौर्णिमाही तेजस्विनीपेक्षा मोठी आहे.
काल शनिवारी (८ ऑगस्ट) रक्षाबंधनच्या दिवशी तेजस्विनी पंडितसाठीपौर्णिमानं खास पोस्ट शेअर केली.
पौर्णिमानं तेजस्विनीसोबतचे फोटो शेअर करत लिहलं, "जिनं माझं नेहमी रक्षण केलं, माझी 'पार्टनर-इन-क्राईम' बनली, माझं सुरक्षित ठिकाण आणि माझी चेअरलीडर. मला कधीच भावाची कमतरता जाणवली नाही. कारण, तू नेहमी माझ्यासाठी ढाल बनून उभी राहिलीस".
पुढे तिनं लिहलं, "तू माझ्यापेक्षा धाकटी असलीस तरी जास्त परिपक्व आहेस, माझ्या आनंदासाठी जगाशी दोन हात करणारी, माझे अश्रू पुसणारी आणि मी प्रत्येक वादळ पार करून इंद्रधनुष्य पाहिलं, याची खात्री करणारी तू आहेस".
पौर्णिमानं शेवटी म्हटलं, "मला माझ्या भावना व्यक्त करायला आवडतं आणि सोशल मीडियामुळे मला जगासमोर तुझ्यावरील प्रेम व्यक्त करता येत आहे, याचा मला आनंद आहे. जगात तुझ्यासारख्या बहिणी अधिक असाव्यात अशी माझी इच्छा आहे. जिनं मला कोणत्याही धाग्यापेक्षा मजबूत अशा प्रेमाच्या धाग्यानं मला बांधलं आहे, तिला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा".
तेजस्विनीच्या बहिणीचे पूर्ण नाव पौर्णिमा पुल्लन असं आहे. तर विनीत पुल्लन असं तेजस्विनीच्या भाऊजींचे नाव आहे. पौर्णिमानं गेल्या दिवाळीतचं आई झाली. तिनं मुलीला जन्म दिला.
तेजस्विनी पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा ये रे ये रे पैसा ३ (Ye Re Ye Re Paisa 3) हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेजस्विनीने अभिनयासोबतच 'येक नंबर' चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आहे.