सोनाली कुलकर्णीचे साडीतील फोटो पाहून चाहते घायाळ, PHOTO VIRAL
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:08 IST2021-02-02T16:51:54+5:302021-02-02T17:08:41+5:30
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
'नटरंग' या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.
तिने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
'बकुळा नामदेव घोटाळे' या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.
सध्या तिच्या विविध अदा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
साडीमध्ये शेअर केलेले फोटो पाहून चाहते फुल ऑन फिदा होत आहेत.
साडीमुळे तिच्या सौंदर्याला आणखीन चारचाँद लागले आहेत.
अप्सराप्रमाणेच सोनाली साडीमध्ये सुंदर दिसत आहे.
गेल्याच वर्षी तिचा साखरपुडा झाला होता.
आता लवकरच लग्नबंधनात अडकत आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे.