'शाळा' सिनेमातला मुकुंद आठवतोय का? आता गाजवतोय साऊथ इंडस्ट्री, इतका बदलला की ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:16 IST2026-02-04T13:10:13+5:302026-02-04T13:16:01+5:30

साधा भोळा, शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला मुकुंद प्रेक्षकांना भलताच आवडला होता. मात्र या सिनेमानंतर तो गायब झाला.

मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन आणि गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'शाळा'. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

या सिनेमात केतकी माटेगावकर आणि अंशुमन जोशी मुख्य भूमिकेत होते. अंशुमनने सिनेमात मुकुंद जोशी ही भूमिका साकारली होती.

साधा भोळा, शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला मुकुंद प्रेक्षकांना भलताच आवडला होता. मात्र या सिनेमानंतर तो गायब झाला.

शाळा सिनेमानंतर तो कुठेच दिसला नाही. आता त्याच्यात खूप बदल झाला आहे.

अंशुमन पडद्यावर दिसत नसला तरी तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे. एक अभिनेता असण्यासोबत तो लेखक आणि दिग्दर्शकही आहे.

कोकण या युट्यूब सीरिजमध्ये तो दिसला होता. अंशुमनने मल्याळम सिनेमातही काम केलं आहे.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या थँकम सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा त्याचा पहिला साऊथ सिनेमा होता.

आता अंशुमन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अंशुमन लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेसोबत अंशुमन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.