सई ताम्हणकरच्या काळ्या साडीत बोल्ड अदा, फोटो पाहून चाहते झाले क्लीनबोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 19:49 IST2025-04-09T19:43:56+5:302025-04-09T19:49:31+5:30

Saie Tamhankar : सई ताम्हणकरचे काळ्या रंगाच्या साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.

सई ताम्हणकरचे गुलाबी साडीतले फोटो व्हायरल होत असताना आता तिने काळ्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीतही सई ताम्हणकर खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.

सई ताम्हणकरच्या काळ्या रंगाच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.

सई ताम्हणकर सध्या तिच्या बॅक टू बॅक सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

लवकरच तिचा गुलकंद हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

त्यानंतर सई इमरान हाश्मीसोबत ग्राउंड झिरो या सिनेमात झळकणार आहे.

सई आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे.