लग्नाला १४ वर्ष! सुखी संसारासाठी 'ही' एकच गोष्ट पाळतात रितेश-जिनिलिया, पाहा त्यांच्या लग्नाचे Unseen फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:06 IST2026-02-03T14:57:14+5:302026-02-03T15:06:55+5:30
रितेश-जिनिलयाकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जिनिलियाने एका मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं. तिने याचं क्रेडिट रितेशला दिलं होतं.

रितेश देशमुख आणि जिनिलिया हे केवळ सिनेसृष्टीतलेच नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके कपल आहेत. लाडक्या दादा वहिनींचे हजारो चाहते आहेत.

रितेश आणि जिनिलियाने २०१२ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. आज त्यांच्या लग्नाचा १४वा वाढदिवस आहे.

रितेश आणि जिनिलियाने हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जिनिलियाने खास फोटो शेअर केले आहेत.

रितेश-जिनिलयाकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. जिनिलियाने एका मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं. तिने याचं क्रेडिट रितेशला दिलं होतं.

जिनिलिया म्हणाली होती की "मी याचं क्रेडिट रितेशला देईन. कारण तो कोणत्याच गोष्टीचा इश्यू करत नाही".

"आम्ही कधीच भांडत नाही. आमचं भांडण तेव्हाच होतं जेव्हा मला भांडायचं असतं".

"त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर भांडायला आवडत नाही. कधी कधी मलाच तसं वागायला आवडतं. कारण मी वेगळी व्यक्ती आहे".

"पण तोदेखील मला आवडत नाही. मला वाटतं की कधी कधी यातच आम्हाला संवादाचा सूर सापडतो", असं जिनिलियाने सांगितलं होतं.

रितेश आणि जिनिलियाला दोन मुले आहेत. अनेकदा रितेश-जिनिलिया कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात.

















