रिंकू राजगुरूचा रॉयल कारभार...! अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते झाले सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 13:32 IST2022-09-02T13:24:32+5:302022-09-02T13:32:24+5:30

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. यात ती राजेशाही थाटात दिसत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

बऱ्याचदा रिंकू राजगुरू सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू हिने राजेशाही अंदाजात फोटोशूट केली आहे.

रिंकू राजगुरूने शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळत आहे की, तिने गुलाबी रंगाची नववारी साडी, गळ्यात नेकलेस आणि नाकात नथ घालून लूक पूर्ण केला आहे.

या फोटोत रिंकू ढोल वाजवून गणेशाचं स्वागत करताना दिसत आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

रिंकू राजगुरूचा रॉयल लूकनं चाहत्यांना घायाळ केले आहे.

रिंकू राजगुरू शेवटची आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटात पाहायला मिळाली.