Bhaubeej 2024 : रिंकू राजगुरूने लाडक्या भावाबरोबर साजरी केली भाऊबीज, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 10:22 IST2024-11-05T10:07:54+5:302024-11-05T10:22:26+5:30
रिंकूचं तिच्या लहान भावावर जीवापाड प्रेम आहे.

यंदा देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यंदा दणक्यात दिवाळी साजरी केली. अभिनेत्री अभिनेत्री रिंकू राजगुरूनेही (Rinku Rajguru) यंदाची दिवाळी तिच्या कुटुंबासोबतच साजरी केली.
यंदा दिवाळीत रिंकूने मराठमोळ्या लूकला पसंती देत निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
दिवाळी पाडवा झाल्यानंतर असते ती भाऊबीज. या दिवशी बहिणी भावाला ओवाळते. तसंच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. रिंकूने तिच्या लाडक्या भावाबरोबर भाऊबीज साजरी केली आहे.
रिंकूने भाऊबीजेचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सुंदर दिसतेय. तर तिच्या भावाने ग्रे रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसून आलं.
यावेळी तिच्या भावाने मोठ्या बहिणीच्या पाया पडून दर्शन घेतलं.
भाऊबीजेनिमित्त त्यांच्यातील खास बाँडिंग दिसून आले. तिच्या या फोटोंवर चाहते विविध कमेंट करत आहेत.
सिद्धार्थ (siddharth rajguru) असं रिंकूच्या भावाचं नाव आहे.
सिद्धार्थ प्रचंड साधा असून त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड आहे.
रिंकूने यंदाच्या १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला भावासोबतचे खास फोटो शेअर केले होते.
रिंकू प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करते. चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहात आहेत.