IN PICS : प्रेम हे प्रेम असतं...! मराठी अभिनेत्री अमराठी अभिनेत्यांच्या प्रेमात...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:54 PM2023-02-28T16:54:15+5:302023-02-28T17:06:03+5:30

Marathi Actress : प्रेम कुणावर होईल आणि कधी होईल हे काही सांगता येत नाही. आयुष्यात एखादा अनपेक्षित क्षण येतो आणि नकळत आपण एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडतो. या मराठी अभिनेत्रींबद्दलही असंच म्हणता येईल...

प्रेम कुणावर होईल आणि कधी होईल हे काही सांगता येत नाही. आयुष्यात एखादा अनपेक्षित क्षण येतो आणि नकळत आपण एखाद्या व्यक्तिच्या प्रेमात पडतो. या मराठी अभिनेत्रींबद्दलही असंच म्हणता येईल...

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिने बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणासोबत लग्नगाठ बांधली. पहिल्या भेटीनंतर बराच काळ दोघं एकमेकांच्या संपर्कात नव्हते. यानंतर आशुतोष यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी रेणुकांना फोन केला आणि मग वरचेवर फोनवर बोलणं सुरू झालं. एक दिवस आशुतोष यांनी रेणुकाला लग्नाची मागणी घातली. खूप विचार करून रेणुकाने आशुतोष यांना होकार दिला.

मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांच्याशी लग्नगाठ बांधली. जॅकी श्रॉफने किशोरी व बलराज यांची ओळख करून दिली होती. दीपक यांनी किशोरी यांना 'हफ्ता बंद' या चित्रपटात संधी दिली. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची मैत्री झाली. त्यानंतर काहीच वर्षांत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं.

बॉलिवूडमध्ये फार काही यश मिळत नाहीये, हे पाहून मराठमोळी नम्रता शिरोडकरनं साऊथकडे मोर्चा वळवला आणि वामसी हा तेलगू सिनेमा साईन केला. हा सिनेमा साईन केला नसता तर कदाचित महेशबाबूच्या आयुष्यात एक मराठी मुलगी आलीच नसती. ‘वामसी’ या चित्रपटात महेशबाबू हा नम्रताचा हिरो होता. महेश बाबू व नम्रता ‘वामसी’च्या मुहूर्ताला पहिल्यांदा भेटले आणि या पहिल्याच भेटीत महेशबाबू नम्रतावर लट्टू झाला.

मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिने बॉलिवूड अभिनेता बिजय आनंदसोबत लग्न केलं. बिजय आणि सोनाली यांची भेट 'रात होने को है' या मालिकेदरम्यान झाली होती. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये त्यांनी सोबत काम केलं आणि त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं आणि त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला.

मराठमोळी अभिनेत्री गौतमी गाडगीळने बॉलिवूड अभिनेता राम कपूरशी लग्न केलं. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत राम व गौतमीने दीर-भावजयीची भूमिका साकारली होती. पुढे या रिल लाईफ भावजयीसोबत राम कपूरने लग्नगाठ बांधली. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच राम आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.

मराठमोळी अभिनेत्री शिबानी दांडेकर बॉलिवूड हिरो फरहान अख्तरसोबत लग्नबेडीत अडकली. फरहान आणि शिबानी यांची पहिली भेट एका रियालिटी शोमध्ये झाली होती. 2015 मध्ये 'आय कॅन डू इट' या रिॲलिटी शोमध्ये फरहान अख्तर होस्ट होता. तर शिबानी दांडेकर स्पर्धक होती. या रिॲलिटी शो दरम्यानच फरहान आणि शिबानी यांची प्रेमकहाणी सुरू झाल्याचं मानलं जातं.

अमृता खानविलकरने बॉलिवूड अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. अमृता आणि हिमांशूची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. जवळपास १० वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होतं. २४ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी लग्न केलं. अमृता ही मराठी आणि हिमांशू हा पंजाबी असल्यामुळे 'पंजाबी-मराठी' अशा दोन्ही पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला होता.

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकरने साऊथ अभिनेता मुरली शर्माशी लग्नगाठ बांधली. अपहरण या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. सेटवर त्यांची मैत्री झाली आणि मग एकमेकांच्या प्रेमात पडले. २००९ मध्ये दोघांनी थाटात लग्न केलं होतं.

मराठमोळी अभिनेत्री इशा केसकर 'काहे दिया परदेस' मालिकेतील मुख्य अभिनेता ऋषी सक्सेनाच्या प्रेमात आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. पाहताक्षणी तो अतिशय शांत असल्याचं इशाच्या लक्षात आलं. नंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांच्यात बोलणं झालं. पुढे कॉफीसाठीच्या भेटीगाठी वगैरे सुरु झाल्या. इशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. या भेटीतच त्याचा निरागसपणा तिचं मन जिंकून गेलं.