निळ्या रंगाच्या साडीत खुललं प्रार्थना बेहरेचे सौंदर्य, दिसतेय लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 07:00 IST2021-03-20T07:00:00+5:302021-03-20T07:00:00+5:30
प्रार्थना बेहरेच्या साडीतील फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
नुकतेच प्रार्थना बेहरे हिने निळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
या साडीवर तिने नेकलसही घातला आहे. तिच्या या फोटोतील तिच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रार्थना वेस्टर्न आउटफिट इतकीच साडीतही सुंदर दिसते.
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली.
'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे.
यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे.