छत्रपती शिवरायांच्या सूनबाई महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसल्या 'या' अभिनेत्री; तुम्हाला कोणाची भूमिका आवडली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:41 IST2026-02-19T16:34:02+5:302026-02-19T16:41:59+5:30
अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या भूमिका साकारल्या. मात्र महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारे अनेक सिनेमे आणि मालिका आहेत.

अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या भूमिका साकारल्या. मात्र महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

अनेक अभिनेत्रींनी महाराणी येसूबाईंची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली. गेल्या वर्षीच प्रदर्शित झालेल्या 'छावा' सिनेमा अभिनेत्री रश्मिका मंदाना येसूबाईंच्या भूमिकेत होती.

रश्मिकाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अभिनयात तिने कसलीही कसर सोडलेली नाही. पण, असं असलं तरी ती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवू शकली नाही.

'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात अभिनेत्री रेवती लिमये ही महाराणी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत होती. या सिनेमात गश्मीर महाजनी संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता.

अभिनेत्री तृप्ती तोराडमल हिने 'शिवरायांचा छावा' या सिनेमात येसूबाईंची भूमिका साकारली होती. दिग्पाल लांजेकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.

अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील येसूबाईंची भूमिका साकारली होती. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या सिनेमात ती दिसली होती.

पण, या सगळ्या अभिनेत्रींमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने साकारलेली येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. ती म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

आजही येसूबाई म्हटलं की प्रेक्षकांना प्राजक्ताच डोळ्यासमोर येते.

















