Photos: नेहा पेंडसेच्या सावत्र लेकींना पाहिलंय का? अगदी मैत्रिणींसारखाच आहे बाँड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:19 IST2026-03-02T13:14:13+5:302026-03-02T13:19:57+5:30
नेहा पेंडसे मराठीतील बोल्ड, बिंधास्त अभिनेत्री. कोण आहेत तिच्या सावत्र मुली?

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नेहा 'मे आय कम इन मॅडम?' या मालिकेतून घराघरात पोहचली.

नेहाने २०२० मध्ये उद्योगपती शार्दुल बायससोबत लग्न केले. शार्दुलचे हे तिसरे लग्न असल्याने नेहाच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

शार्दुल बायस यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. एकीचं नाव रिया तर दुसरीचं आलिया बायस आहे.

नेहाचे सावत्र मुलींसोबत छान बॉण्डिंग आहे. नेहा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. प्रत्येक व्हेकेशनचे फोटो ती शेअर करते. काही ठिकाणी तिच्यासोबत सावत्र मुलीही दिसतात.

या फोटोंवरुन त्यांच्यात अगदी मैत्रिणींसारखाच बाँड असल्याचं लक्षात येतं. मात्र या दोन्ही मुली प्रसिद्धीपासून दूरच राहतात.

शार्दुल बायस मोठे बिझनेसमन आहेत. २२ कंपन्यांचे ते मालक आहेत. कित्येक कोटींची त्यांची संपत्ती आहे. तर नेहा अभिनेत्रीसोबतच निर्मातीही आहे.

नेहाने १९९५ मध्ये एकता कपूरचा टीव्ही शो 'कॅप्टन हाउस'मधून तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती फक्त १० वर्षांची होती.

यानंतर ती 'हसरतें' आणि 'पडोसन' सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली.१९९९ मध्ये 'दाग: द फायर' ,सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसंच काही दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तिने भूमिका साकारल्या.

याशिवाय नेहाने मराठीमध्ये 'भाग्यलक्ष्मी' मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवली होती. 'दुसरी गोष्ट', 'प्रेमासाठी कमिंग सून', 'बाळकडू', 'नटसम्राट', 'जून' या गाजलेल्या मराठी सिनेमातही तिने काम केले आहे.

















