नेहा पेंडसे दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, लेटेस्ट फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:59 IST2025-07-26T15:43:59+5:302025-07-26T15:59:34+5:30

Neha Pendse : अभिनेत्री नेहा पेंडसेचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहेत.

नेहा पेंडसे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकेत काम केले आहे.

नेहा पेंडसे सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच एक्टिव्ह आहे.

नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसे हिने इंस्टाग्रामवर ऑरेंज रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

नेहा पेंडसे हिने ऑरेंज ड्रेसमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

नेहा पेंडसे दिवसेंदिवस ग्लॅमरस होत चाललीय. सोशल मीडियावर सतत फोटो शेअर करत असते.

नेहा पेंडसेने मराठी चित्रपटांशिवाय हिंदी मालिकेत काम केले आहे. तसेच ती बिग बॉस १२मध्येही झळकली आहे.

नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली आहे.