'नॅशनल क्रश' गिरीजा ओकची नणंदही आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:15 IST2025-11-13T17:07:02+5:302025-11-13T17:15:46+5:30

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक अचानक 'नॅशनल क्रश' म्हणून व्हायरल झाली आहे.

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे दिसत आहे. रातोरात गिरीजा 'नॅशनल क्रश' म्हणून व्हायरल झाली आहे.

एका मुलाखतीतील तिचा लूक पाहून लोक तिच्या सौंदर्याची स्तुती करत आहेत. निळी साडी, पांढरा ब्लाऊज, छोटी टिकली, मोकळे केस यामध्ये ती सुंदर दिसत आहे.

गिरीजा ओकला आत्ता अख्खा देश ओळखू लागला आहे. पण महाराष्ट्रासाठी, मराठी लोकांसाठी ती नवीन नाही. तिला आपण मालिका, नाटक, सिनेमा आणि जाहिरातींमधून पाहतच आलोय.

गिरीजाने 'तारे जमीन पर','शोर इन द सिटी' शाहरुख खानसोबत 'जवान' आणि नुकतंच मनोज वाजपेयींसोबत 'इन्स्पेक्टर झेंडे' हे हिंदी सिनेमे केले आहेत. तसंच ती मराठीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची लेक आहे.

गिरीजाने २०११ साली निर्माता सुहृद गोडबोलेसह लग्नगाठ बांधली. दोघांचं लव्हमॅरेज होतं. त्यांना एक मुलगाही आहे. सुहृद हा मराठीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा आहे.

तर गिरीजाची नणंद ही देखील अभिनेत्री आहे. सुहृदच्या सख्ख्या बहिणीचं नाव मृण्मयी गोडबोले आहे. मृण्मयी 'चि.व चि.सौ.का.' या मराठी सिनेमामुळे लोकप्रिय झाली होती.

तसंच मृण्मयी भाडिपाच्या 'मी आई आणि...' या सीरिजमध्येही दिसते. तसंच हिंदीतही ती अॅक्टिव्ह आहे.

गिरीजा आणि मृण्मयी यांच्यात नणंद भावजय नाही तर अगदी बहि‍णींप्रमाणेच नातं आहे. अनेकदा दोघी एकमेकींबरोबरचे व्हिडीओ शेअर करत असतात.