२७व्या वर्षी थाटला संसार, २ वर्षात घटस्फोट, मराठमोळी अभिनेत्री आता बनलीय ओटीटी स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:37 IST2025-08-22T16:32:23+5:302025-08-22T16:37:51+5:30
आम्ही आज तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे.

आम्ही आज तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे.
अभिनयाच्या दुनियेत ४ वर्षे झाली असतानाच ती एका व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्टच्या प्रेमात पडली. ही अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
सई ताम्हणकरने १५ डिसेंबर २०१३ रोजी व्हिज्युअल इफेक्ट आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केले. अमेयही चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक निर्माता असून त्याच्या कंपनीचे नाव लोडिंग पिक्चर्स आहे. सई आणि अमेय दोघेही एकाच क्षेत्रात काम करतात, पण त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही.
सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी लग्नाआधी तीन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. जेव्हा अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्र खूप खूश झाले होते.
७ एप्रिल २०१२ रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर ते दोघे लवकरच लग्न करतील, असे म्हटले जात होते. पण सई कामात व्यग्र असल्यामुळे त्यांनी एक वर्षासाठी लग्न पुढे ढकलले.
१५ डिसेंबर २०१३ रोजी तिने मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यावेळी सई २७ वर्षांची होती. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. २०१५ साली दोघांचा घटस्फोट झाला. सईने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.
सईने गेल्या ४ वर्षांत ओटीटीवर ९ वेबसीरिजमध्ये काम केले आहे. यापैकी 'डब्बा कार्टल', 'मानवत मर्डर', 'क्राइम बीट', 'पेट पुराण' आणि 'समांतर' या सीरीज खूप लोकप्रिय झाल्या. सईच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ती मराठी चित्रपटसृष्टीतही खूप सक्रिय आहे.
सईने 'मिमी', 'भक्षक', 'ग्राउंड झिरो'मध्येही काम केले आहे. सई जितकी चांगली अभिनेत्री आहे, तितकीच ती चांगली कबड्डी खेळाडूही राहिलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सई राज्यस्तरीय कबड्डीपटू राहिलेली आहे. ती कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट चॅम्पियनही राहिलेली आहे.