गळ्यात मुळाक्षरांची माळ, कपाळावर चंद्रकोर; 'मराठी भाषा गौरव' दिनानिमित्त सोनालीची लक्षवेधी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:59 AM2024-02-27T11:59:42+5:302024-02-27T12:07:36+5:30

आज २८ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केलेत.

मराठी भाषेची महती सांगण्यासाठी सोनालीने इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, सोनाली मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे.

मराठी कलाविश्वातील या अप्सरेने 'नटरंग', 'हिरकणी', 'मितवा' अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये काम करत आता मल्याळम सिनेमातही एन्ट्री केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या सिनेमात सोनालीने दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे ती चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

या पोस्टमध्ये सोनालीने लिहिलं आहे, बाराखडी गिरवताना कुठे माहीत होतं? पुढे, हाती खजीना लागणारे ! तिच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

पिवळी,लाल रंगाची गडद साडी परिधान करत तिने पारंपरिक लूक केलाय. शिवाय गळ्यात घातलेली मुळाक्षरांची माळ विशेष आकर्षण ठरतेय.

सोनालीचा हा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.